📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

गुडबाय मांढरे सर ; गंगाथरन डी. यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

मालेगाव (जय योगेश पगारे) नवनियुक्त जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी मावळते जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. जिल्हाधिकारी यांच्या मुख्य दालनात हा सोहळा पार पडला. यावेळी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जिल्हा सूचना व तंत्रज्ञान अधिकारी राजेश साळवे, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, नितीनकुमार मुंडावरे, गणेश मिसाळ, भीमराज दराडे, वासंती माळी, नितीन गावंडे, निलेश श्रींगी, ज्योती कावरे, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत पवार, राजेंद्र नजन व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी नाशिक या पदावरील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर शासनाने माझी राज्याचे शिक्षण आयुक्त म्हणून नियुक्ती केलेली आहे. 
आज तो पदभार स्वीकारण्यासाठी मी जात आहे.
नाशिकच्या कार्यकाळात आपणाकडून मिळालेले सहकार्य व स्नेह कधीही विसरता येणार नाही. त्यामुळे नाशिकशी माझा कायमस्वरूपी ऋणानुबंध तयार झाला आहे. 
नवीन पदावर कार्यरत असतानाही आपला संपर्क असाच राहील..
🙏
आपला स्नेहांकित,
सूरज मांढरे, 
नाशिक
दि 11 मार्च 2022

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने