📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

४३ वर्षांनंतर संपन्न झाला, विद्यार्थी व गुरू जनांच्या उपस्थितीत स्नेह मेळावा

राकेश आहेर | चांदवड देवळा

   मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या दिंडोरी येथिल जनता इंग्लिश स्कूल मधिल सन १९७९ च्या दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात संपन्न झाला.    
   कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने करून उपस्थित मान्यवर गुरूवर्य यांचा शाल श्रीफळ व 'बुके' ऐवजी "बुक" भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच माजी मुख्याध्यापक कै एन के पवार यांना व गेल्या ४३ वर्षाच्या कालावधीत मयत झालेल्या विद्यार्थ्यी मित्र मैत्रिणींना श्रद्धांजली अर्पण केली व त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी आपली ओळख, व करीत असलेल्या कार्याचा परिचय करून मनोगत व्यक्त केले.          
  प्रत्येकाने आपापल्या कौटुंबिक परिस्थितीची व त्रेचाळीस वर्षाच्या वाटचालीची थोडक्यात माहिती दिली. गुरुवर्य गुलाबराव कापनिस, एस एल पाटील, गुरुळे, कलाशिक्षक पगार, सायन्स चे शिक्षक देशमुख,यांनी या स्नेहमेळाव्याचे तोंड भरुन कौतुक केले. तत्कालीन शिस्तप्रिय मुख्याध्यापक कै एन के पवार सरांच्या कठोर शिस्त व त्यांनी विद्यार्थ्यांना लावलेल्या योग्य वळनामुळेच सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले अंसे इतिहासाचे शिक्षक एस एल पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात हिंदी चे शिक्षक गुलाबराव कापडनिस यांनी विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले, क्रिडा शिक्षक गुरुळे संरामुळे व कलाशिक्षक पगार संरामुळे अनेक विद्यार्थी राज्य व देश पातळीवर चमकले होते. त्यानंतर आभार प्रदर्शन होऊन सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला. या स्नेहसंमेलनाचे यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे संयोजक भाऊ मोरे, दत्तात्रेय जाधव, माणिकराव बुरड, यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्नेहसंमेलनासाठी भाऊ मोरे यांनी आपल्या वलखेड येथील ओरायजा राईस मिल व समर्थ मिलची प्रशस्त जागा उपलब्ध करून देऊन सर्व व्यवस्था चोख ठेवली होती.
  याप्रसंगी कुबेर जाधव लिखित "सहकारनामा" व सौ. प्रतिभा भार्गवे लिखित कृष्णाई, मनमोर, इवलेसे रोप ह्या लेखांचा समावेश असलेले तीन पुस्तके उपस्थितांना विनामूल्य आठवण म्हणून सस्नेह भेट देण्यात आली. तसेच भाऊ मोरे यांनी देखील "दिंडोरी तालुक्याची स्थित्यंतरे" हे पुस्तक सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना व उपस्थित गुरुजनाना भेट म्हणून दिले. 
 सुमारे त्रेचाळीस वर्षांच्या कालखंडानंतर बाल्यावस्थेतून ज्येष्ठ नागरिक म्हणून उंबरठ्यावर उभे असलेले हे विद्यार्थी- विद्यार्थिनी व गुरुवर्य भेटल्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले. हृदय व मन भरून आले. काय बोलावे? किती बोलावे ? कोणालाही सुचत नव्हते. जो तो भरभरून आपले अनुभव, आपल्या गतकाळातील आठवणी, सांगण्याचा प्रयत्न करीत होता. सहा-सात तासाचा वेळ कसा गेला कोणाला कळले देखील नाही. एकंदरीत सर्वच मित्र-मैत्रिणी आनंदाने भारावून गेले होते. अत्यंत आनंददायी व आल्हाददायक वातावरणात हा स्नेहमेळावा यशस्वीपणे संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने