📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मराठी भाषा ज्ञानभाषा म्हणून समृद्ध झाली पाहिजे तसेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे -राजेंद्र शेवाळे

 मालेगाव (राजेश धनवट ) के. बी.एच .विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगांव कॅम्प येथे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी , लेखक, नाटककार ,कथाकार व समीक्षक, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा.  शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून  माय बोली भाषा दिन(मराठी भाषा गौरव दिन) दिनानिमित्ताने काव्यवाचन, हस्ताक्षर व  वक्तृत्व स्पर्धा तसेच व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांस्कृतिक विभागाचे राजेंद्र शेवाळे होते .यावेळी प्राचार्य प्रवीण पाटील (आबासाहेब), उपप्राचार्य राजेंद्र पाटील, उपप्राचार्य रवींद्र शिरूडे, पर्यवेक्षक नितीन गवळी, पर्यवेक्षक संजय शिंदे , संजीव महाले, ज्येष्ठ प्रा. पी.एन. शिंदे जेष्ठ शिक्षिका श्रीमती पुष्पा वाघ, कार्यालय प्रमुख संजय सूर्यवंशी व्यासपीठावर उपस्थित होते.  व्यासपीठावरील मान्यवरांच्या  शुभहस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती पुष्पा वाघ व प्राध्यापक बाळासाहेब ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य प्रवीण पाटील यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
    कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र शेवाळे यांनी महाराष्ट्राचे भूषण नाशिकचे वैभव मराठी  कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून का साजरा केला जातो  तसेच मराठी भाषा ज्ञानभाषा म्हणून समृद्ध झाली पाहिजे व  मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे .मराठी भाषेचा  उगम,  मराठी भाषा नेहमीच समृद्ध होती समृद्ध आहे आणि समृद्ध राहणारच असे सांगून कुसुमाग्रजांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन केले.
        काव्यवाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला जितेंद्र पवार -प्रथम, सोहम मोरे- द्वितीय, तुषार अहिरे- तृतीय ,दिनेश सादनूर- उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले या विद्यार्थ्यांनी काव्यातून मराठीचा जागर केला.यांनतर जेष्ठ शिक्षिका श्रीमती पुष्पा वाघ व  राजेंद्र शेवाळे, आर. के. बोरसे यांनी सादर केलेल्या  सुरेख कवितांना उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद देऊन  काव्यवाचन  स्पर्धेचा समारोप अतिशय रंगतदार झाला. हस्ताक्षर स्पर्धेत हितेश माळी- प्रथम, वेदांत नेरकर- द्वितीय, तेजस सोनजे -तृतीय तसेच वक्तृत्व स्पर्धेत हितेश माळी -प्रथम, सोहम बोरसे-द्वितीय,धनंजय पवार ने  तृतीय क्रमांक पटकावला.
          प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेश धनवट यांनी केले. आभार शशिकांत पवार यांनी मानले.कार्यक्रमास  शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर बंधू व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस. के. सूर्यवंशी, के.वाय. देवरे ,सौ.आशा पगार तसेच मराठी विषयाचे सर्व शिक्षक यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने