सोयगाव (जय योगेश पगारे) सोयगाव मधील पार्श्वनाथ नगर भागात डॉ. रोशन वर्मा यांच्या दुमजली घरापैकी पहिल्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली.
आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले मात्र दैव बलवत्तर म्हणून घरी कोणी नसल्यामुळे सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की पार्श्वनाथ नगर भागात डॉ. वर्मा यांच्या घराला आज रात्री साढेआठ - नऊच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली, काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले होते, स्थानिक नागरिकांनी ताबडतोब इलेक्ट्रिक मिटर चे कनेक्शन तोडून, आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले, व अग्निशमन विभागास याबाबत सूचना दिली, आजूबाजूच्या लोकांनी स्वतःच्या बोरिंगच्या साह्याने पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत अग्निशमन दलाचे तीन बंब व पोलीस घटनास्थळी दाखल झाले व आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले, परंतु डॉ. वर्मा यांचे संसारोपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.