📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

एनडीसीसी बँकेचा प्रताप, दहिवड शाखा अचानक बंद करून दुसऱ्या शाखेत वर्ग करण्याचा निर्णय, संतप्त ग्रामस्थांकडून बँकेला टाळे.

 देवळा: ज्ञानेश्वर आढाव
    
 (दि.25 ) देवळा तालुक्यातील दहिवड येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा परस्पर दुसर्‍या शाखेत विलीनीकरण करून ठेवीदारांना न कळवता साहित्य  उचलण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना आज घडली, ही बाब गावातील ठेवीदारांच्या लक्षात येताच गावातील नागरिकांनी शाखेत धाव घेतली व शाखाधिकारी यांना याबाबत विचारपुस केली,  त्यावर त्यांना सांगण्यात आले की दहिवड येथील शाखा ही बंद करून दुसऱ्या शाखेत वर्ग करण्यात आली आहे. 
         ही बातमी कळताच प्रहारचे तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर यांनी शाखेत धाव घेतली. शाखाधिकारी यांना विचारले की खातेदारांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता तुम्ही शाखा कशी बंद करू शकता? तुम्हाला जर शाखा बंद करायची असेल तर खातेदाराने जी ठेव तुमच्या शाखेत ठेवली आहे आहे ती परत करा आणि तुमची शाखा खुशाल बंद करा. यावेळी शाखाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात बराच वेळ खडाजंगी झाली. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाचा ग्रामस्थांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला.

मिळालेल्या माहितीनुसार सदर शाखेमध्ये ठेवीदारांचे सुमारे तीन कोटींच्यावर ठेवी आहेत. यावेळी संतप्त ठेवीदारांनी आमची ठेव 
परत करावी व त्यांची शाखा कुठेही न्यावी अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.

   याबाबत शाखाधिकारी यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी सांगितले की दि.२४/०२/२०२२ रोजी रात्री शाखा बंद करण्याची लेखी सूचना त्यांना वरिष्ठांकडून प्राप्त झाली, परंतु  सदर आदेशाची प्रत मागितली असता त्यांनी उशिरापर्यंत टाळाटाळ केली.

 प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर व ग्रामस्थांच्या रोषाला शाखाधिकाऱ्याना  सामोरे जावे लागले. शेवटी संतप्त खातेदारांनी बँकेला कुलूप लावले.

     जो पर्यंत खातेदारांच्या ठेवी मिळत नाही तो पर्यंत शाखा कुठेही जाऊ देणार नाही असा इशारा यावेळी प्रहारचे दहिवडकर यांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने