सकल मराठा समाजाच्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी आणि मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी युवराज श्रीमंत संभाजीराजे छत्रपती हे मुंबई येथे आमरण उपोषणास बसणार आहेत, समाजच्या न्याय्य मागण्यांसाठी व छत्रपती संभाजी राजे यांना पाठींबा देण्यासाठी मालेगांव येथे समविचारी संघटना, मराठा आरक्षण कृती समीती व सकल मराठा समाजाच्या वतीने सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस सर्व पक्षीय सकल मराठा समाजाने उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात आले आहे.
मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात सकल मराठा समाजाच्या वतीने 58 मुक मोर्चे निघाले होते, लाखोंच्या संख्येने या मोर्चात सर्वपक्षीय मराठा समाजासह बारा बलुतेदार बांधवही सामील झाले होते, अत्यंत शिस्तबध्द व नियोजनानुसार सगळे मोर्चे संपन्न झाले, तरीही तत्कालीन व आत्ताच्या सरकारांनी त्यांच्या तोंडाला फक्त आश्वासनांची पानेच पुसली, आता राजे श्रीमंत संभाजी छत्रपती यांनी अंतीमयुध्द पुकारले आहे, आपणांस या अस्तीत्वाच्या लढाईत त्यांच्या युध्दातील सैनीक म्हणुन सामील होवून मराठा समाजास न्याय मिळवून द्यायचा आहे. यासाठी गटतट, पक्ष, संघटना आणि राजकारण विसरुण पुन्हा एकजुटीने आपणांस समाजाच्या मागणीसाठी एकत्र येण्याची नितांत आवश्यकता आहे, 'अभि नही तो, कभी नहीं' म्हणून वैयक्तीक मतभेद विसरुन सगळ्यांनी समाजाच्या भल्यासाठी संघटीत होवून लढा उभारण्यासाठी एकत्रीत यावे असेही आवाहन प्रसिध्दी पत्रकात करण्यात आले आहे.