आकाश साळुंखे (सटाणा)
एकदंत इंग्लिश मीडियम स्कूल औंदाने येथे सर्वधर्मसमभाव अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.
महाराजांच्या मुख्य भूमिकेत इयत्ता 6वीचा विद्यार्थी मोहिन खलील शेख व माँसाहेब जिजाऊ च्या भूमिकेत इयत्ता 1ली ची विद्यार्थीनी अनन्या पंकज पाटिल यांनी साकारली होती शाळेच्या मुख्य प्रवेशद्वार पासुन अश्वावर विराजमान होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे लेझिम नृत्य पथकावर आगमन झाले.त्यानंतर अध्यक्ष व प्रमुख पाहून्यांच्या हस्ते शिवरायांच्या अर्धकृति पुतळा व प्रतिमीचे पूजन झाले दीपप्रज्वलन करुन शिवरायांची आरती करण्यात आली नंतर विद्यार्थ्यानी आपआपले मनोगत व्यक्त केले सर्वांची भाषण झाल्यावर शिवरायांच्या बालपनाच्या जीवनावर आधारित नृत्य सादरिकरण झाले व विविध प्रकारचे गाने, नृत्य , पोवाडे झाले याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीराम मुसळे ,सचिव प्रतीक मुसळे, प्रमुख पाहुणे औंदाने च्या च्या सरपंच निकम, मुख्याध्यापिका मोतलिंग मॅडम ,उप-मुख्याध्यापक साळुंके तथा जयश्री पवार यांनी प्रस्तावना केली तर भाग्यश्री पाटिल यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते