देवळा: ज्ञानेश्वर आढाव
आज अख्खा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. शिव जन्मोत्सवानिमित्ता विविध उपक्रम राबविण्यात आले. विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याना विद्युत रोषणाई, पोवाडे , मिरवणूक असे विविध कार्यक्रम आयोजित केले गेले.व जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
परंतु चांदवड तालुक्यातील खडकजांब येथील शिवप्रेमी श्री . सोमनाथ भाऊसाहेब गुंजाळ यांनी अनोखा उपक्रम राबविला . त्या शिवप्रेमी चे शिवनेरी नावाचे अमृततुल्य चहाचे दुकान नाशिक हायवे येथे आहे. तेथे त्यांनी आज संपूर्ण दिवस येणाऱ्या प्रवाशांना मोफत चहा वाटप केली.
मी स्वतः त्यांची भेट घेऊन त्यांना त्याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की आपण समाजाचे काही तरी देणे लागतो .तसेच स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा म्हणून मी येणाऱ्या प्रवाशांना मोफत चहा वाटप करण्याचे ठरवले. मी भेटलो तो पर्यंत एक हजार चहा वाटप करण्यात आले होते. व सायंकाळी पर्यन्त दोन हजार चहा वाटप करण्याचे ठरवले आहे असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाची चांदवड तालुक्यात मोठी चर्चा होतो.