📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगाव तालुका आदर्श बी एल ओ पुरस्कार जाहीर

 देवळा | ज्ञानेश्वर आढा
               महाराष्ट्रासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये आदर्श मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार जाहीर करण्यात आला.
                नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आदर्श मतदार नोंदणी अधिकारी म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडेल येथील कर्तव्यदक्ष उपशिक्षक  ज्ञानेश्वर भगवानराव चाफेकानडे यांना निवडणूक अधिकारी  डि.बी वाणी यांच्या हस्ते देण्यात आला.
             चाफेकानडे हे गेल्या दहा वर्षांपासून मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मालेगाव तालुक्यातील वडेल येथे काम करतात. त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना हा आदर्श मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार देण्यात आला.
         अजंग केंद्राचे केंद्र प्रमुख निकम सर , वडेल येथील पंचायत समिती सदस्य नंदूकाका शिरोळे ,वडेलचे सरपंच नरेंद्र सोनवणे, उपसरपंच सौ. प्रमिलाताई महाले , सर्व सदस्य,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडेल चे मुख्याध्यापक राजेंद्र सोनवणे व सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन  केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने