मालेगाव (राजेश धनवट) के.बी.एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारताला पहिला नोबेल पुरस्कार मिळवून देणारा विज्ञान अविष्कार ज्यादिवशी सर चंद्रशेखर वेंकट रामनांनी जगासमोर मांडला त्या ऐतिहासिक राष्ट्रीय विज्ञान दिनी व्याख्यान,विज्ञान प्रदर्शन व निबंध स्पर्धा मोठ्या उत्साहत संपन्न.
के.बी.एच.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती वाढावी आणि विज्ञानातील संशोधक निर्माण व्हावेत यासाठी विद्यार्थ्यांनी विविध विज्ञानाच्या स्पर्धेत उस्फूर्तपणे सहभाग घेत जिज्ञासू वृत्तीचे दर्शन घडवून विविध विज्ञान प्रकल्प, भारतीय शास्त्रज्ञांच्या शोधांचा अभ्यास करून नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार करावेत .कठोर परिश्रमातून विद्यार्थ्यांनी स्वतःचे आगळवेगळे व्यक्तिमत्व घडवावे असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रवीण पाटील यांनी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन व मार्गदर्शन करताना केले. तसेच सर्व बाल वैज्ञानिकांना व विज्ञान शिक्षकांना विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य राजेंद्र पाटील, उपप्राचार्य रवींद्र शिरूडे, पर्यवेक्षक नितीन गवळी, पर्यवेक्षक संजीव महाले ,पर्यवेक्षक संजय शिंदे, विज्ञान विषय प्रमुख डी.के.सोनजे, ज्येष्ठ शिक्षका श्रीमती पुष्पा वाघ, राजेंद्र शेवाळे, के.वाय. देवरे,एस.के.सुर्यवंशी, एच.एन.सोनवणे ,आर.एम. खैरनार, श्रीमती जोस्ना देवरे, शशिकांत पवार , एम. एम. वाघ, टी. डी. बोरसे,ए.एम. भालेराव, बी.पी. सोनवणे उपस्थित होते.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते थोर शास्त्रज्ञ डाॅ. सी. व्ही. रामन व माजी राष्ट्रपती भारतरत्न थोर शास्त्रज्ञ डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बालवैज्ञानिक सोहम बोरसे ,अनिकेत शिंदे, ओम कन्नोर या विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केले.शिक्षक प्रतिनिधी के.वाय.देवरे व आर.एम.खैरनार यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व विशद केले. निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी प्रितम अहिरे-प्रथम, हितेश माळी -द्वितीय ,स्वरूप कोठावदे -तृतीय, यज्ञेश पवार व ओम गवळी यांनी उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले.यावेळी प्राचार्य ,उपप्राचार्य, पर्यवेक्षक तसेच सर्व विज्ञान शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविक विज्ञान विभागाचे प्रमुख डी.के. सोनजे यांनी केले. सूत्रसंचालन राजेश धनवट यांनी केले व आभार विज्ञान शिक्षक सुनील सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हेमंत पगारे ,सौ. आशा पगार तसेच शिक्षक बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले.