📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सॉरी आबा तुम्हाला न सांगताच जातोय..व्हिडिओ तयार करत जवानाची आत्महत्या

धुळे तालुक्यातील लामकानी येथील गोरख नानाभाऊ शेलार ऊर्फ गौतम (वय २५) या भारतीय सेनेतील जवानाने  आत्‍महत्‍या केली. गोरख शेलार भारतीय सेनेत पुणे  येथील आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजात शिपाई पदावर कार्यरत होते. गोरख शेलार हे चार वर्षांपूर्वीच २०१७ मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले होते. 

सासरच्या नातेवाईकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या?
 आत्महत्या करण्यापूर्वी या जवानाने आत्महत्या करण्याचे कारण व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले. 
त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 'सॉरी आबा, तुम्हाला न सांगताच जातोय..' असे म्हणत त्यांना होत असलेल्या त्रासाची सर्व कैफियत व्हिडिओ बनवून आत्महत्या केली आहे.

मानसिक छळ करणाऱ्यांची व्‍हीडीओत नावे
कौटुंबिक वादाला आणि वारंवार होणाऱ्या बदनामीला कंटाळून आत्महत्या केल्याचा उल्लेख व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. ज्या आप्तस्वकीयांनी मानसिक छळ केला त्यांचा नामोल्लेख केला आहे. गोरख यांचे वडील नानाभाऊ तानका शेलार शेतकरी होते. त्यांनी देखील कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून त्यांनी आत्महत्या (farmer) केली होती. मोठा भाऊ केशवने मोठ्या मेहनतीने गोरखला शिकवीत भारतीय सैन्यात भरती केले होते. गोरख सैन्यात भरती झाल्याने कुठे चांगले दिवस परिवारास आले होते. अशात गोरख यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याने गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
सौ. साम

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने