📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

प्रेमप्रकरणाच्या वादातून युवकाला जिवंत जाळले

देवळा (प्रशांत गिरासे)  लोहणेर येथे प्रेमप्रकरणाच्या वादातून एका युवकाला जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना घडली असून यामध्ये हा युवक 55 % भाजल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. 
गोरख काशिनाथ बच्छाव‌ (वय २६) असे या युवकाचे नाव असून घटनास्थळी पोलीस पोहचले आहेत.
 संबंधित युवकाला देवळा येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. मुलीचे लग्न मोडल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे

पीडित तरुणाने मुलीचे लग्न मोडल्याच्या संशयातून घटना
मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील रहिवासी असलेल्या मुलीचे देवळा तालुक्यात लोहणेर येथील गोरख बच्छाव सोबत सात वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघेही नातेसंबंधातील असल्याचे बोलले जाते. मात्र दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे ब्रेक अप झाले होते. ब्रेक अप का झाले ते कळू शकले नाही. दोघांच्या ब्रेकअपनंतर मुलीचे दुसरीकडे लग्न ठरले होते. मात्र काही कारणाने हे लग्न मोडले. त्यामुळे गोरखनेच मुलीच्या सासरच्यांना सांगून लग्न मोडले, असा मुलीला आणि तिच्या घरच्यांना संशय होता. याच संशयातून त्यांनी गोरखला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आई, वडील व दोन भाऊ यांनी संगनमताने मुलाच्या डोक्यात वार करुन मुलीने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यात तरुण 55 टक्के भाजल्याची वैद्यकीय सूत्रांकडून माहिती मिळते. देवळा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत युवकाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने