पाटणे (राजेश धनवट) गावाला लागूनच आपल्या पवित्र जलप्रवाहाने खळखळून वाहणारी गिरणा नदी, परसुल नदी आणि दाभाडी कडुन वाहत येणारी दोधेश्वर नदी या त्रिवेणी पवित्र संगमावरील मोठा महादेव मंदिर ,बाळू दादा झाडू दादा यासारखे ग्रामदैवतांचे पवित्र स्थान, श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या पदस्पर्शाने व व वै. महंत भगवतदासजी महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पाटणे भूमीत १२ फेब्रुवारी२०२२ ते १४ फेब्रुवारी २०२२ दरम्यान श्री संत शिरोमणी सावता महाराज, श्री विठ्ठल रुक्मिणी ,महादेव, नंदी प्राणप्रतिष्ठा व मंदिर जीर्णोद्धार व वै. परशराम बाबा पादुका पूजन सोहळ्याचे आयोजन श्री श्री १००८ महंत सुदामजी महाराज(मुल्हेर), श्री श्री १००८ महंत रमेशपुरीजी महाराज (रामेश्वर शिवालय पाटणे ),महंत कृष्णदासजी महाराज नांदेड, श्री बलदेवदासजी महाराज (मोठा महाराज मंदिर पाटणे ),महंत रामदास महाराज (भंडारा डोंगर दहिवड), डॉ. महंत योगी विलासनाथजी महाराज, रमेश महाराज वमेकर (भरणभेंडी) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
११ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता भजन सम्राट अभिषेकजी दायमा यांचा भजन संध्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच १२ फेब्रुवारीला सकाळी गावातून शोभायात्रा . दैनदिन कार्यक्रम अंतर्गत पहाटे पाच ते सहा काकडा भजन, सात ते आठ विष्णुसहस्रनाम त्यानंतर मूर्ती प्राणप्रतिष्ठापण विधी, सायंकाळी सहा ते सात हरिपाठ.
रात्री नऊ ते अकरा महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार महाराजांचे हरिकीर्तन. १२ फेब्रुवारी रोजी ह. भ. प. मारुती महाराज खैरे (वायगांव साळ), रविवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी विद्या विनोद वैभव ह. भ. प. केशव महाराज उखळीकर बीड, सोमवार १४ फेब्रुवारी रोजी ह. भ. प. केशव महाराज उखळीकर बीड यांचे काल्याचे किर्तन त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
कलशारोहन श्री श्री १००८ महंत सुदामदासजी महाराज (मुल्हेर), श्री कारभारी सखाराम खैरनार यांच्या शुभहस्ते तसेच मूर्ती प्राणप्रतिष्ठा श्री श्री १००८ महंत रमेशपुरीजी महाराज (रामेश्वर शिवालय पाटणे) तसेच महंत कृष्णदासजी महाराज नांदेड यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
पाटणे येथेज्ञ साकारलेल्या भव्यदिव्य मंदिराच्या तीनदिवसीय प्राणप्रतिष्ठा व मंदिर जीर्णोद्धार सोहळा ,महायज्ञ या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री संत सावता महाराज बांधकाम समिती व पाटणे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags
patne