📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सौंदाणे देवळा रस्ते अपघातात एकाचा मृत्यू

देवळा | ज्ञानेश्वर आढाव
          आज सौंदाणे देवळा रस्त्यावर पावजी दादा चौफुली (उमराणे) येथे कंटेनर व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटर सायकल स्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
     याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सौंदाणे- देवळा रस्त्यावरील पावती दादा चौफुली (उमराणे) जवळ कंटेनर (क्रमांक एम एच ४६ बी एड ४५०७) व मोटरसायकल (क्रमांक एम एच ४१ ए एच ८२२२) यांच्यात अपघात होऊन मोटर सायकल स्वार रघुनाथ पंढरीनाथ मोरे (३५) रा. उमराणे हा इसम जागीच ठार झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे घटनास्थळी दाखल झाले.पोलीसांनी अपघात ग्रस्त कंटेनर ताब्यात घेतला असून , देवळा ग्रामीण रुग्णालयात मयत रघुनाथ मोरे यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले.देवळा पोलिसात मोटर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,अधिक तपास पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने