📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

कोरोना गेला उडत, चंदनपुरी यात्रेत भाविकांचा 'येळकोट'

चंदनपुरी (जय योगेश पगारे) मध्यंतरी सोशल मीडियावर एक विनोद चांगलाच गाजत होता, पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या वेळी करून आतून बरे झालेल्या रुग्णांचे घरी जंगी स्वागत केले जात असे... परंतु तिसर्‍या लाटेत रुग्णांना त्यांच्या घरचे सुद्धा सिरियस घेत नाहीत असं मिश्किल पण मार्मिक टोमणा या विनोदातून स्पष्ट होत होता.

 तिसऱ्या लाटेच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे राज्य शासनाने यात्रा उत्सव यांच्यावर बंदी घातली आहे. चंदनपुरी येथील यात्रेला देखील परवानगी नाकारण्यात आली होती. यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली होती. गेली दोन वर्ष यात्रा रद्द होती आणि गेल्या वर्षी पर्यंत कोरोना ची भीती ही लोकांच्या मनात होती मात्र यावेळी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत यात्रा भरली असून, आज रविवारी 30 जानेवारी रोजी सुटीच्या दिवशी भाविकांनी प्रचंड गर्दी करीत भंडाऱ्याची उधळण केली.

कसला कोरोना आणि कसले नियम?
गेली दोन वर्ष कोरोना मध्ये होरपळलेल्या सामान्य नागरिकांपासून तर यात्रेतील स्टोल धारकापर्यंत अनेकांनी आर्थिक झळ सोसली आहे परंतु आज सर्वच जण तिसऱ्या लाटेच्या अथवा व ओमायक्रोनच्या भीतीला गमतीत उडवत आहेत, वास्तविक कोरोनाने अनेकांचे बळी गेले असले तरी सध्या मालेगाव परिसरात रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे तसेच सर्दी खोकला सारखा आजार सर्वत्र असल्यामुळे आता कुणीही भीत नाही घरीच उपचार करून बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे, मागच्यावेळी कुठलेही डॉक्टर अशा लक्षणांवर उपचार करीत नव्हते प्रत्येक वेळी प्रत्येक पेशंटला ते कोरोना चाचणी करण्यास सांगत होते, परंतु आता बरेच जण कोरोना चाचणी करणे टाळत घरच्या घरी उपचार करणे पसंत करत आहेत. वास्तविक मागच्या वेळेच्या कोरोनाची दाहकता यावेळेस कोणाच्याच निदर्शनात येत नाहीये किंवा लसीकरणाचा फायदा घेऊन या भागातील नागरिकांना कोरोनाचा पाहिजे तेवढा फरक पडत नाही, मनातील भीती नाहीशी झाल्यामुळे तसेच हर्ड इम्युनिटी मुळे देखील कोरोना या भागातून नाहीसा झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने