सौंदाणे (समाधान पवार) आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित गुरुवर्य दादासाहेब बोवा आश्रमशाळा सौंदाणे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा....
गुरुवर्य दादासाहेब बोवा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सौंदाणे येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री. काशिनाथ लक्ष्मण गुंजाळ होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन सौंदाणे ग्रामपंचायतीचे मा. सदस्य श्री. रामदास आनंदा पवार, माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री. वसंत रामदास बच्छाव उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रमुख पाहुणे श्री. व्ही. आर. बच्छाव सर यांच्या हस्ते ध्वजपुजन तर प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री. के. एल. गुंजाळ सर याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारताचे संविधान दिनांक २६ जानेवारी १९५० पासुन अमंलात आले असुन भारतीय संविधानाची पुरेशी माहिती नागरिकांना असणे आवश्यक आहे. भारतीय राज्य घटनेतील मुलतत्वांची व्याप्ती व सर्व समावेशकता सर्व नागरिकांना समजावी आणि त्याचबरोबर घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता ही मुलतत्वे समाज मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपुर्ण परिचय नागरिकांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधानातील मुलतत्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी असुन नागरिकांच्या मनात याची रुजवणूक झाल्यास जबाबदार, सुजाण व सुसंस्कृत नागरिक घडविण्यास मदत होईल. त्यामुळे दि. २६ जानेवारी २०२० पासून दरवर्षी होणार्या ध्वजारोहण कार्यक्रमापुर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिका(सरनामा) यांचे सामुहिक वाचन करण्यात यावे असे महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागच्या शासन परिपत्रकान्वये निर्देश देण्यात आल्याची माहिती श्री. समाधान पवार यांनी उपस्थितांना दिली असता ध्वजारोहणापुर्वी सर्व उपस्थितांनी भारताच्या संविधानामधील उद्देशिका(सरनामा) यांचे सामुहिक वाचन केले.
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन शालेय आवारात वृक्षारोपन करण्यात आले तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा, शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी दोन्ही शाखेचे मुख्याध्यापक, अधिक्षक – अधिक्षिका, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, समाजकल्याण वस्तीगृह विभागाचे अधिक्षक – अधिक्षिका व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन श्री. समाधान पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. अशोक पवार यांनी केले. सदर समारंभ आयोजित करतांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे तथा सुचनाचे अनुपालन करण्यात आले.
Tags
saundane