मालेगाव (जय योगेश पगारे) मालेगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी पर्यंत साजरा करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने मालेगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालय व सर्व नागरिक यांचे करिता
१) निबंध लेखन
२) कविता लेखन
३) घोषवाक्ये
४) परिच्छेद अनुवाद
ही स्पर्धा आयोजित केलेली असुन या स्पर्धेसाठी पुढीलप्रमाणे वयोगट आहेत.
अ) इयत्ता ५ वी ते ७ वी.
ब) इयत्ता ८ वी ते १० वी.
क) खुला गट
वरीलप्रमाणे वयोगटासाठी स्पर्धेसाठी सहभाग घेणा-या विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांसाठी खालीलप्रमाणे सुचना आहेत.
I) “माझी वसुंधरा ” या विषयावर सुमारे २०० ओळीपर्यंत निबंध सुवाच्च हस्ताक्षरात A 4 आकाराच्या कागदावर लिहावा.
II) “माझी वसुंधरा ” या विषयावर एक छान कविता सुवाच्च हस्ताक्षरात A 4 आकाराच्या कागदावर लिहावी
III) “माझी वसुंधरा ” या विषयावर दोन ओळींचे अथवा चार ओळींचे घोषवाक्ये A 4 आकाराच्या कागदावर लिहावीत.
IV) “माझी वसुंधरा ” या विषयासाठी इंग्रजी परिच्छेद असुन त्याचा मराठी भाषेत अनुवाद करून सुवाच्च हस्ताक्षरात A 4 आकाराच्या कागदावर लिहावा.
सदरचा इंग्रजी परिच्छेद महानगरपालिकेच्या मुख्यालयातील जनसंपर्क विभागात तसेच महानगरपालिकेच्या चारही प्रभाग कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रभाग अधिकारी यांचेकडे उपलब्ध असेल. स्पर्धकांनी तो इंग्रजी परिच्छेद प्राप्त करुन त्याचा मराठी भाषेत अनुवाद करुन तो सुवाच्च हस्ताक्षरात विहीत ठिकाणी जमा करावा.
V) वरीलप्रमाणे विविध वयोगटातील स्पर्धेसाठी सहभाग घेणा-या विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी आपला निबंध, कविता, घोषवाक्ये, परिच्छेद अनुवाद A 4 आकाराच्या कागदावर लिहुन तो एका लिफाप्यात बंद करावा. तसेच लिफाफा चिटकविण्याचे ठिकाणी स्वत:ची स्वाक्षरी करावी. लिफाप्यावर स्पर्धकाने आपले पुर्ण नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक (स्वत:चा / पालकांचा), वयोगट , शाळा / विद्यालयाचे नांव नमुद करावे व लिफाप्यावर मोठया अक्षरात मालेगाव महानगरपालिका, मालेगाव आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत
१) निबंध लेखन २) कविता लेखन ३) घोषवाक्ये ४) परिच्छेद अनुवाद
यापैकी ज्या स्पर्धेसाठी भाग घेतला आहे त्या स्पर्धेचा उल्लेख ठळक अक्षरात करावा.
व सदरचा स्पर्धकाचा स्वाक्षरीत असलेला बंद लिफाफा दिनांक २८ जानेवारी, २०२२ दुपारी ५.०० वाजे पर्यंत मालेगाव महानगरपालिका आयुक्त यांचे कार्यालयाबाहेर असलेल्या पेटीत (बॉक्स) मध्ये टाकावीत,
ही कार्यवाही करणेसाठी महापालिकेत प्रवेश करतांना केंद्र शासन व राज्य शासनाचे मार्गदर्शक सुचनाप्रमाणे मास्क, सोशल डिस्टंसिंग, सॅनीटाईझरचा वापर करणे या त्रिसुत्रीबरोबरच लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरणाचे निकष पुर्ण होत नसतील त्यांचे पालकांनी / नातलगांनी ही प्रकिया पार पाडावयाची आहे.
सदरची स्पर्धा ही मराठी भाषा संवर्धनासाठी असलेने स्पर्धेसाठी खालीलप्रमाणे नियम राहतील.
१) स्पर्धा ही सर्व वयोगटासाठी खुली असुन यात एका स्पर्धकाला अ) निबंध लेखन ब) कविता लेखन क) घोषवाक्ये आणि ड) परिच्छेद अनुवाद यापैकी फक्त एकाच स्पर्धेसाठी भाग घेता येईल.
२) वरील स्पर्धेसाठी परिक्षक हे शहरातील नामवंत शाळा तसेच महाविद्यालयाचे मराठी भाषा या विषयाचे तज्ञ शिक्षक असुन परिक्षकांनी दिलेला निर्णय हा अंतिम राहील.
३) परिक्षकांनी दिलेल्या निर्णयाबाबत कोणताही आक्षेप ग्राह्य धरला जाणार नाही.
४) सर्व स्पर्धकांनी स्पर्धा ही “माझी वसुंधरा” या विषयावर असल्याने त्याबाबत आपले निबंध, कविता, घोषवाक्ये मराठी भाषेतील आपले प्रभावी विचार, संकल्पना व विचार सादर करावेत.
५) स्पर्धेतील विविध वयोगटासाठी प्रथम विजेता स्पर्धकांस रुपये १०००/- व प्रमाणपत्र, द्वितीय विजेता स्पर्धकांस रुपये ७००/- व प्रमाणपत्र, तृतीय विजेता स्पर्धकांस रुपये ५००/- व प्रमाणपत्र असे बक्षिस असुन स्पर्धेत सहभाग घेणा-या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क राहणार नाही.
मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक व विद्यार्थ्यांना विनंती करणेत येते की, मराठी भाषा सवंर्धन करणेसाठी जास्तीत जास्त सहभाग नोंदवुन मराठी भाषा सवंर्धनासाठी प्रयत्न करावेत.
- आयुक्त
मालेगाव महानगरपालिका, मालेगाव.