देवळा | राकेश आहेर
देवळा तालुक्यातील लोहणेर येथे एका युवकाने नदिपात्रात उडी घेत आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोहणेर ठेंगोडा दरम्यान वाहत असलेल्या गिरणा नदिपात्रात एका युवकाने व्हिडिओ कॉल करत गिरणा नदिपात्रात उडी घेत आपली जिवयात्रा संपवली आहे. युवकाचे वय साधारण ३० वर्ष असून सुनिल भगवान माळी, राहणार राहणार दर्हाणे फाटा तालुका बागलाण असे युवकाचे नाव असुन शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.
शनिवारी सकाळी ही घटना समजताच अग्निशमन दल व स्थानिक पोहणाऱ्या युवकांनी मृतदेह बाहेर काढला असुन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. यावेळी नदिपात्रावर बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ कॉल नेमका कुणास केला गेला होता, व आत्महत्या का केली आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.