📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल निषेध, देवळा भाजपाच्या वतीने पोलीस निरीक्षक यांना निवेदन

 देवळा |ज्ञानेश्वर आढाव
     
          काल नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मारण्याची व व शिवीगाळ करू शकतो असे विधान त्यांनी केले होते.
या विधानामुळे त्यांच्याविरुद्ध संपूर्ण देशात निषेध नोंदवण्यात आला ‌. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कालच नाना पटोले यांच्याविरोधात आंदोलन रास्ता रोको करण्यात आला काही ठिकाणी त्यांचा प्रतीकात्मक सुद्धा जाणा झाला तसेच नाशिक मध्ये सुद्धानाना पटोले यांच्याविरुद्ध तक्रार नोंद करण्यात आली .
         त्याच एक भाग म्हणून आज देवळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी केलेल्या विधानाबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी केली.
  यावेळी देवळा तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष किशोर चव्हाण, युवा मोर्चा अध्यक्ष दिशांत देवरे, हर्षद मोरे, सोपान सोनवणे व तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने