देवळा | ज्ञानेश्वर आढाव
नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या आमदार निधीतून देवळा तालुक्यातील देवपुरपाडे येथील ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालय शाळेस संगणक भेट देण्यात आले.
सदर कार्यक्रम येथील ग्लोबल व्हिजन इंडिया बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेच्या आवारात घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक येथील ग्लोबल व्हिजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मयूर आहेर यांनी केले.
यावेळी नगरसेवक जितेंद्र आहेर , संतोष शिंदे,सुनील आहेर आदी मान्यवर उपस्थित होते. यापुर्वीही आमदार डॉ.तांबे यांनी देवळा तालुक्यातील शाळांना संगणक भेट दिले आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिमन बापु अहिरे, मुख्याध्यापक वाघ सर ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी,पालक यांनी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे आभार मानले.