📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सोयगाव नागरी आरोग्य केंद्रातर्फे शहरात मोफत कॅन्सर, दंतचिकित्सा, रक्त तपासणी शिबिराचे आयोजन

सोयगाव (जय योगेश पगारे) मालेगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत सोयगाव नागरी आरोग्य केंद्रातर्फे शहरात मोफत कॅन्सर, दंतचिकित्सा, रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
मालेगाव महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी, उपायुक्त (विकास) राजू खैरनार, आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आरोग्य विभागा अंतर्गत सोयगाव नागरी आरोग्य केंद्रातर्फे शहरातील दि. ०६ डिसेंबर २०२१ रोजी तुळजा भवानी मंदिर, त्र्यंबकराज नगर व दि.०७ डिसेंबर २०२१ रोजी इंदिरा नगर, सोयगाव येथील डॉ. मिलिंद ठाकरे यांच्या दवाखान्या समोरील प्रांगणाच्या ठिकाणी शिबिर घेऊन गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर या रुग्णांची मोफत तपासणी करून तसेच नवकार दंतचिकित्सा यांचेमार्फत दंत तपासणी करून रुग्णांना औषध गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. 

या शिबिरासाठी नाशिक मानवता कॅन्सर हॉस्पिटल येथील तज्ञ डॉ.गरीमा व मंजुषा पाटील यांच्या टीमने व नवकार दंतचिकित्साचे डॉक्टर हिमांशु राय यांचे टीमने तसेच डॉ. सपना ठाकरे, डॉ.अलका भावसार, डॉ. ऋषिकेश साळुंके,डॉ.गौरव बेंडाळे यांनी शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहून रुग्णांशी संवाद साधला व नागरिकांना याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले.

सोयगाव येथे देखील कॅन्सर पीडित व दंतचिकित्सा रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी एकूण ३५० रूग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती डॉ.सपना ठाकरे यांनी दिली. सदर शिबिरासाठी सोयगाव नागरी आरोग्य केंद्र येथील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन शिबिर यशस्वीरित्या पार पाडले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने