जुनी शेमळी:- शिवशंभु संघटना नाशिक जिल्हा अध्यक्षपदी जुनी शेमळी येथील गणेश बाळासाहेब बागूल यांची नियुक्ती करण्यात आली. आराई येथील स्वप्निल अहिरे यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. मनोज निकम युवा आघाडी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तसेच मुकेश लखन युवा आघाडी कार्य अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती शिवश्री महादेव पवार संस्थापक अध्यक्ष राहुल नाईकनवरे राज्य अध्यक्ष यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्हा अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या संमतीने तालुकाध्यक्ष आनंद दाणी, दिनेश पगारे यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.
सदर नियुक्ती झालेल्या मान्यवरांना सटाणा येथील शिवतीर्थ येथे नियुक्तीपत्र धर्मरक्षक पंकज सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी वृक्षमित्र रविराज बच्छाव ,आनंद दाणी, दिनेश पगारे, राजू शिवदे, स्वप्नील अहिरे, रोहित आहिरे, कृष्णा जगताप आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद दाणी यांनी केले तर आभार वृक्षमित्र रविराज बच्छाव यांनी मानले.
शिवशंभु संघटना नाशिक जिल्हाध्यक्षपदी शेमळी येथील गणेश बागूल यांची निवड झाल्यानंतर नियुक्तीपत्र देताना धर्मरक्षक पंकज सोनवणे, रविराज बच्छाव, आनंदा दाणी, स्वप्नील आहिरे, दिनेश पगारे आदी