देवळा नगरपंचायतीत आज अर्ज छाननी च्या दिवशी भारतीय जनता पार्टी चे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले.
प्रभाग क्रमांक १४व १७ मधील इतर उमेदवारांचे अर्ज छाननीत अवैध ठरविण्यात यात भाजपा जिल्हाध्यक्ष मा.केदा नाना आहेर यांचे बंधू मा.संजय आहेर यांची प्रभाग क्रमांक -१४ मधून बिनविरोध निवड झाली.
तसेच अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना देवळा शहराध्यक्ष मनोज आहेर यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला .त्यांचा पक्ष प्रवेश होताच त्यांची सुध्दा प्रभाग क्रमांक-१७ मधूनबिनविरोध निवडीची फक्त औपचारिकता बाकी आहे.