चेन्नई : भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. तामिळनाडूच्या कुन्नूर जवळ हेलिकॉप्टर क्रॅश झालं या दुर्घटनेत 14 लष्करी अधिकारी जागीच ठार झाले आहे, मृतांमध्ये तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख जनरल बिपिन व त्यांच्या पत्नीचा ही समावेश आहे
माजी लष्करप्रमुख आणि सीडीएस बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करत होते. तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे . हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमींना जवळच्या वेलिंग्टन बेसमध्ये नेण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्यासह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, रावत यांची पत्नी मधुरीका रावतही होत्या.अशी माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली. यातील अनेक जणांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती हवाई दलाने दिली आहे. MI-17, V-5 या सीरिजचं हे होतं.
या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत,मधुलिका रावत,गुरुसेवक सिंग,जितेंद्र कुमार,विवेक कुमार,,बी. साई तेजा, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर,,लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग,हवालदार सतपाल आदी प्रवास करीत होते, बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. वेलिंग्टनमध्ये आर्म्ड फोर्सचं महाविद्यालय आहे. या ठिकाणी रावत यांचं लेक्चर होतं. तिथून ते कुन्नूरकडे निघाले होते. त्यांना तिथून दिल्लीला जायचं होतं. मात्र, घनदाट जंगलात ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत काही जण होरपळले आहेत. काही जणांचे मृतदेह मिळाले असून ते 80 टक्के भाजलेले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली आहे कुन्नूरच्या घनदाट जंगलात चारही बाजूने झाडच झाडं आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघात होताच जंगलात आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळतात हवाई दल आणि लष्कराची पथकं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं.
लष्कर प्रमुख मनोज नरवणे आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये बैठक
लष्कर प्रमुख मनोज नरवणे आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यामध्ये बैठक सुरु झाली आहे. थोड्याच वेळात राजनाथ सिंह संसदेत निवेदन देणार आहेत. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही माहिती दिली. कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 14 जण प्रवास करत होते. यामध्ये संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावतदेखील या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते.