📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगाव सामान्य रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांचा धुडगूस; रुग्णालयात तोडफोड..

मालेगांव (मनोहर शेवाळे) 

सामान्य रुग्णालयात कायमचं असे प्रकार होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण...

सामान्य रुग्णालयातील आय सी यू मध्ये उपचार घेत असलेल्या वृध्द महिलेचे नातेवाईक महिलेसह भेटीसाठी आले असता घडला हा प्रकार..

याबाबत सविस्तर वृत्त असे की रुग्णालयातील सेक्युरीटी गार्ड यांनी आय सी यू वॉर्डात जास्त वेळ थांबू नका असे सांगितल्याचा राग आल्याने नातेवाईक असलेल्या एका तरुणाने गार्ड बरोबर हुज्जत घातली यात दोघांमध्ये हातापाई झाली. दरम्यान रुग्णाचे इतर १५ ते २० महीला व पुरुष नातेवाईकांनी रुग्णालयात येवून धिंगाणा घालत रुग्णालयातील खुर्ची, कुंडी आदींची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर आपल्या फौजफाट्यासह रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी धिंगाणा करणाऱ्या दोन तीन जणांना ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

कोरोनाच्या महामारीत ह्याच डॉक्टरांनी देवासारखे काम केलं आणि अश्या पध्दतीने नातेवाईक जर असा विकृतपणा करत असतील तर अश्यांवर कठोर कारवाई होणे तेव्हढेच गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने