📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवपुरपाडे येथील आश्रम शाळा बांधकाम व रस्ते दुरुस्तीसाठी मंत्री के सी पाडवी यांना साकडे

 देवळा | ज्ञानेश्वर आढाव
         देवळा तालुक्यातील देवपुरपाडे येथे आदिवासी विकास विभाग अंतर्गत आश्रम शाळा होती . आश्रम शाळा बरेच दिवस ही गावातील रिकाम्या घरांमध्ये चालत होती. विद्यार्थी संख्या सुध्दा चांगली होती . परंतु कालांतराने वर्ग खोल्या जीर्ण होत चालल्या होत्या. पर्याय म्हणून  देवपुरपाडे गावातील जागा देण्याचे ठरवले.महालपाटणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अभिमन अहिरे यांनी तसा ठराव करून आश्रम शाळेसाठी जागा देण्याचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने ठरवले.  कारण आदिवासी विद्यार्थ्यांना गावात च मोफत शिक्षण मिळावे. म्हणून बापुसाहेबानी देवपुरपाडे येथील महालपाटणे ग्रामपंचायतीची 2.5 एक्कर जागा    
आश्रम शाळेसाठी ग्राम पंचायतीचा ठराव करून दिली.
        परंतु शासनाच्या वतीने फक्त जागा आदिवासी विकास विभाग यांच्या नावाने करून घेतली आणि आश्रम शाळा ही बागलाण तालुक्यातील पांढरूंग याठिकाणी हलवण्यात आली. 
      पण आश्रम शाळा ही देवपुरपाडे गावात परत सुरु करावी व दिलेल्या जागेवर शासनाने इमारत बांधकाम करावे अशी मागणी मा.अभिमन बापु आहिरे यांनी या राज्याचे आदिवासी विकास मंत्री अॅड के.सी.पाडवी साहेब यांची भेट घेऊन आश्रम शाळा बांधकाम व रस्ते दुरुस्तीसाठी मंत्री महोदयांशी चर्चा केली. यावेळी देवपुरपाडे ग्राम पंचायतीचे सदस्य अजय अहिरे,निरपुरचे माजी सरपंच भाऊसाहेब सुर्यवंशी,शशी पवार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने