देवळा | ज्ञानेश्वर आढाव
देवळा तालुक्यातील मेशी ग्रामपंचायत पोट निवडणूक अत्यंत चुरशीची झाली .
या निवडणुकीत दिवंगत ग्रामपंचायत सदस्य तथा देवळा बाजार समितीचे संचालक साहेबराव सुर्यवंशी यांच्या निधनाने रिक्त झालेल्या एका जागेवर पोट निवडणूक येण्यात आली.
एका जागेसाठी दोन उमेदवार समोरासमोर उभे होते.यात दिवंगत साहेबराव सुर्यवंशी यांचे चिरंजीव शरद सुर्यवंशी व प्रतिस्पर्धी शिवसेनेचे देवळा तालुका उपाध्यक्ष बापू जाधव यांच्यात लढत झाली.
काल झालेल्या मतदानाने पुन्हा एकदा दिवंगत साहेबराव सुर्यवंशी यांनी केलेल्या कामाची पावती मतदारांनी त्यांच्या मुलांच्या पारड्यात मतदान केले. व शरद साहेबराव सुर्यवंशी हे ६४ मतांनी विजयी झाले व बापू जाधव यांचा पराभव झाला.