मालेगाव : नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ [रजि.] नाशिक च्या मालेगांव तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै. लोकराष्ट्र टाईम्स चे संपादक चेतन नाना महाजन यांची तर कार्याध्यक्षपदी मनोहर शेवाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शहरातील शासकीय विश्रामगृह येथे नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या मालेगाव शाखेची द्विवार्षिक निवडणूक आज दि.११ रोजी बिनविरोध पार पडली. जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवडणूक झाली, जिल्हाध्यक्ष अण्णा बोरगुडे, विजय बोराडे, रमेश देसले व विनायक माळी उपस्थित होते.
मनोहर शेवाळे यांनी मागील वर्षीचा लेखा जोखा सादर केला. त्यानंतर झालेल्या निवडणूकीत मालेगांव तालुका मराठी पत्रकार संघाची बिनविरोध निवडून आलेली नुतन कार्यकारणी घोषित करण्यात आली.
सर्वांची निवड घोषित झाल्यानंतर संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार,जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे यांचेहस्ते नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी १५ जागांसाठी १५ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुक बिनविरोध झाली.
देशात व राज्यात पत्रकारांच्या संरक्षणासाठी विविध कायद्यांची निर्मिती केली आहे अशा कायद्याविषयी समाजात म्हणावी तशी जागरुकता नाही ती निर्माण व्हावी या करिता देखिल पत्रकार संघाची नुतन कार्यकारणी प्रयत्न करणार आहे असे नवनिर्वाचित अध्यक्ष चेतन महाजन यांनी सांगितले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन रमेश देसले, विजय बोराडे यांनी काम पाहिले.
निवड करण्यात आलेली कार्यकारिणी:
अध्यक्ष: चेतन नाना महाजन
उपाध्यक्ष: हरीश मारू, बलराम चौधरी
कार्याध्यक्ष: मनोहर शेवाळे
सरचिटणीस: विशाल गोसावी
सहसरचिटणीस: जययोगेश पगारे
खजिनदार: राजेश सुर्यवंशी
सहखजिनदार: दीपक देवरे
संघटक: राजेश धनवट
सहसंघटक: हेमंत धामणे
समन्वयक: जिभाऊ भारती
कार्यकारिणी सदस्य: तुषार देसले, निलेश शिंपी,महेंद्र पगार, समाधान शेवाळे