कुकाणे (दिनेश पगारे) वडनेर खाकुर्डी पोलिसांनी धडक कारवाई करत चिंचवे गावातील खालची आदिवासी वस्ती येथे सोमवारी सायंकाळी अवैध मद्य विक्री करणाऱ्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पोलीस शिपाई गणेश सुखदेव जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुनील छगन पवार वय 34 राहणार खालची वस्ती चिंचवे यांने त्याच्याच घराजवळ सुमारे 15 लिटर गावठी हातभट्टीची दारू विनापरवाना विक्रीच्या उद्देशाने अवैध पद्धतीने बाळगताना आढळून आल्याने त्याच्यावर प्रोव्ही. गु.र. नं. 75/2021 मु. प्रोव्ही 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
दुसऱ्या कारवाईत दिपक सिताराम पवार वय 38 रा. चिंचवे याच्या ताब्यातून अवैधपणे विक्रीसाठी बाळगत असलेल्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
API शिंदे , पो. ना. रवि बच्छाव, पो.शि. शिलावट, पो.शि. जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान परिसरातून या कारवाईबाबत समाधान व्यक्त करण्यात येत असून अवैध मद्य विक्री करणार्यांचे धाबे दणाणले असून परिसरात अशा प्रकारचे अवैध काम करणाऱ्यांवर वडनेर खाकुर्डी पोलीसांचा कटाक्ष आहे आहे त्यामुळे पैशांची गैर केली जाणार नाही असे यावेळी पोलिसांनी सांगितले.
पांढरूण येथे बनावट बोगस ताडी दुकान दाराकडुन शासनाच्या आदेशाचे वेळोवेळी उल्लंघन करण्यात आले असुन. मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाने कोरोणा संसर्गजन्य महामारी रोगा मुळे संपुर्ण नाशिक जिल्ह्यात कलम. 144लागू असतांना पांढरूण येथील बोगस बनावट ताडी विक्री होती दारु उत्पादन शुल्क मालेगाव व नाशिक यांच्या कडे तक्रार अर्ज केल्यावर संबंधित विभागाने अजून कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही वरील सर्व प्रकारांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी
उत्तर द्याहटवा