📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

कॅम्प पोलिस ठाण्यात चमत्कार; अवघ्या एका मिनिटात सापडली हरवलेली व्यक्ती.

मालेगाव (जय योगेश पगारे) बरेच जण म्हणतात की सामान्य माणसाने पोलीस व न्यायालयाची पायरी चढू नये, परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रत्येक माणसाला हि पायरी चढावीच लागते, एरवी पोलिसांवर नाराज असणाऱ्या अनेक नागरिकांना पोलिसांच जीवन कसे असते, त्यांचे काम कसे चालते, त्यांच्या परिवाराशी त्यांची वागणूक अथवा त्यांना वेळ दिला जातो का? या साऱ्या गोष्टीची पुसटशी कल्पनाही नसते.

चोरी, भांडण-तंटा, हाणामाऱ्या, खून, दरोडे यांचा तपास, बंदोबस्त  या साऱ्या गोष्टी पोलिसांच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात, त्यांच्या डोक्यावरील ताण सामान्य माणूस कधीच सहन करू शकणार नाही किंवा समजूही शकणार..
पण आज झालेली गोष्ट हा एक चमत्कारच समजता येईल सोयगावातील एका व्यावसायिकाचा भाऊ गेल्या दहा-बारा दिवसापासून अचानक बेपत्ता झाला होता, जवळचे, दूरचे नातेवाईक - मित्रपरिवार सर्वांकडेच तपास करून शेवटी हतबल झालेल्या व्यावसायिकाने मालेगाव लाईव्ह चे संपादक जययोगेश पगारे यांच्याशी संपर्क साधला व घडलेला प्रकार सांगितला, यावर त्यांना पोलिसात हरवलेल्या व्यक्ती बाबत अर्ज करण्याबाबत सांगितले, त्यानुसार व्यावसायिकाने कॅम्प पोलीस स्टेशन गाठले, यावेळी त्यांना हरवलेल्या व्यक्तीचा फोटो तक्रारीची नोंद करण्यासाठी मागितला व ते फोटो घेण्यासाठी बाहेर पडणार तेवढ्यातच हरवलेल्या व्यक्तीचाच त्यांना फोन आला व ते एका धार्मिक स्थळी असल्याचे त्यांनी सदर व्यावसायिकाला सांगितले,  त्यामुळे त्यांचा जीव भांड्यात पडला, ही बातमी त्यांनी आत येऊन सर्व पोलिसांना सांगितल्याने पोलिसांनाही आनंद झाला,  पीएसआय सुनील मोरे, पो.हवा. मनोज डिंगर, पो. शि. सिकंदर काळे, पो.शि. चव्हाण व इतर कर्मचाऱ्यांनी व्यावसायिकाचे अभिनंदन केले. व  मिश्किलपणे म्हणाले की पोलिस स्टेशनच्या पायर्‍यांचा हा चमत्कार आहे.
पोलिस स्टेशन मधील सर्व कर्मचाऱ्यांना हरवलेली  व्यक्ती सापडल्याने मोठा आनंद झाला, व्यावसायिकाने सर्वांचे आभार मानले. 

ही गोष्ट माझ्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही गेल्या दहा - बारा दिवसापासून संपूर्ण परिवार चिंतेत होता, भाऊ कुठे असेल? काही विपरीत तर घडले नसेल ना?? या चिंतेने तहान भूक आणि झोप सुद्धा गायब झाली होती,  पण कधी कधी पोलिसांची पायरी चढणे ही किती फायद्याचे असते असा विचार व्यावसायिकाच्या मनात आला असे त्यांनी मालेगाव लाइव्ह शी बोलताना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने