📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

श्रद्धा पाटील चे ऑलम्पियाड परीक्षेत घवघवीत यश

ज्ञानेश्वर आढाव | देवळा: 

 देवळा: मेशी येथील नवनाथ इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी श्रद्धा अमित पाटील हिने ऑलम्पियाड परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे. गणित व इंग्रजी परीक्षेत चांगले गुण मिळून उत्तीर्ण झाल्याबद्दल ऑलम्पियाड मंडळातर्फे तिला गुणपत्र, प्रशस्तीपत्रक, व ब्राँझ मेडल देऊन गौरविण्यात आले आहे ‌. 
ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन चांगले यश संपादन केल्याबद्दल तिच्यावर सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नवनाथ इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्राचार्य श्रीमती बोरसे , व मेशीचे उपसरपंच भिका बोरसे यांच्या हस्ते तिला मेडल व प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.

श्रद्धा पाटील ही दिवंगत पत्रकार अमित पाटील यांची कन्या तर मविप्र चे सेवानिवृत्त कर्मचारी दिलीप शिरसाट यांची नात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने