📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगाव : आसिफ शेख यांनी पोलीस आणि प्रशासना च्या निर्णया विरोधात दिवाणी न्यायालयात केली याचिका दाखल

मालेगाव (जययोगेश पगारे) मालेगाव शहरात मुशावरत चौकात शांती सभा घेण्याची परवानगी माजी आमदार आसिफ शेख यांनी प्रशासनाकडे मागितली होती, परंतु कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस व तहसीलदारांनी परवानगी नाकारली होती या पार्श्वभूमीवर मंगळवारी परवानगी नाकारल्याचे पत्र हाती पडल्याने राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आसिफ शेख यांनी न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली होती दुसरीकडे आयशा नगर पोलिसांनी त्यांना सीआरपीसी 149 ची नोटीस बजावून सभा किंवा रॅली काढण्यास पायबंद घातला होता, पोलिसांनी सोमवारी परवानगी नाकारत आपला अभिप्राय तहसीलदारांना सादर केला होता तहसिलदारांनी पोलिसांचा अभिप्राय  ग्राह्य मानून परवानगी देता येणार नसल्याचे आदेशित केले आहे, त्यामुळेच परवानगी नाकारली गेल्याने शेख यांनी न्यायालयात दाद मागितली  आहे

 मालेगाव शहरात बारा तारखेला झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मालेगावातील जनतेच्या मनात बेचैनी असून भीतीचे वातावरण आहे, ती भिती मिटवण्यासाठी व शांतता कायम राहण्यासाठी आम्ही  पोलिस व तहसीलदारांकडून  मुशावरत चौकात रॅली व शांती सभेला परवानगी मागितली, पण ती नाकारण्यात आली, त्याचबरोबर मला 149 ची नोटीस देण्यात आली, मी एडवोकेट आरिफ व  एडवोकेट मर्चंट यांच्या तर्फे पोलीस व प्रशासनाच्या निर्णयाच्या विरोधात आज मालेगाव दिवाणी न्यायालयात एक  याचिका दाखल केली आहे, मालेगाव पोलिसांना वाटते की शहरात शांतता नांदू नये, आम्ही त्यांना  विनंती केली होती मला  सभेस परवानगी द्यावी,  परंतु  शहरात शांततेचे संदेश देऊ नये व शांतता सभा घेऊ नये असा पोलिसांचा उद्देश वाटत आहे, तथापि शहरात लोकांमध्ये भीती असून तसे वातावरण निर्माण झाले आहे आणि पोलिसांना वाटते किती भीती ही कायम राहावी, तसेच पोलीस राजकीय मंडळीवर दबाव टाकण्याचे काम करीत आहे आणि त्यामुळे आम्हाला मोर्चा व शांती सभा  यासाठी परवानगी नाकारण्यात येत आहे आणि पोलिसांच्या अशा  वागणुकीमुळे आम्ही कोर्टात आलो आहोत.
- माजी आमदार आसिफ शेख 
सदर गोष्टीमुळे मालेगावात चर्चांना उधाण आले असून एकीकडे मालेगाव शहरात सर्वत्र शांतता असून पुन्हा शांती सभा घेण्याचा हेतू राजकीय तर नाही ना? असा प्रश्न जनसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

दरम्यान मालेगाव शहरासह अमरावती, नांदेड व इतर काही शहरांमध्ये रजा अकादमी तर्फे पुकारण्यात आलेल्या बंदच्या दरम्यान मोर्चाला हिंसक वळण लागून मालेगावात देखील पोलिसांवर दगडफेक तसेच अनेक ठिकाणी जाळपोळही करण्यात आली होती,  त्यात अनेक पोलिस व सामाजिक कार्यकर्ते जखमीही झाले होते, 

त्यानंतर पोलीस व प्रशासनाने सर्व स्थिती नियंत्रणात आणून काही तासातच मालेगावातील सर्व व्यवहार सुरळीत केले होते ते आजतागायत सुरळीत सुरू असून कुठल्याही प्रकारची भीती नागरिकांच्या मनात दिसत नाही, परंतु राजकीय मंडळींतर्फे अशाप्रकारे परवानगी मागण्याच्या उद्देश नेमका सामान्य माणसाच्या लक्षात आला नाही त्यामुळे आता यापुढे न्यायालय या गोष्टीवर काय निर्णय देते यावर संपूर्ण मालेगावकरांचे लक्ष लागून आहे.

malegaon : asif shaikh files plea against police and administration in civil court.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने