प्रतिनिधी देवळा: ज्ञानेश्वर आढाव
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडेल(मालेगाव) येथे गेल्या दोन वर्षांपासून मुख्याध्यापक पद हे रिक्त होते .कोरोनामुळे सर्वच विभागातील महत्वाची पदे रिक्त होती . या कालावधीत जि.प.शाळा वडेल या शाळेचा कारभार प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून श्रीमती. सुर्यवंशी यांनी कारभार चांगल्या पद्धतीने सांभाळला .
दि. 9/11/2021 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडेलला ग्रेडपात्र मुख्याध्यापक म्हणून राजेंद्र सोनवणे यांनी पदभार स्वीकारला, त्यामूळे ग्रामपंचायतीच्या वतीने सत्काराचे आयोजन केले.यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र सोनवणे यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य शांतीलाल रुपा शेलार यांनी केला