📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवळा तालुक्यात चंदन चोरांचा धुमाकूळ; अनेक झाडांची कत्तल करून लाखोंचा ऐवज लंपास

ज्ञानेश्वर आढाव | देवळा
           देवळा तालुक्यातील दहिवड गावात एका रात्रीत अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून चंदनाच्या झाडांची चोरी केली गेली. 
            दहिवड येथील शेतकरी श्री. ग्यानदेव दादाजी अहिरराव ,गट नं -943, गौतम पठाण महिरे गट नं-942/3, मोतीराम भिवा अहिरराव माकोन्या मळा या सर्व शेतकऱ्यांच्या बांधावरील चंदनाची झाडे कापून नेली .

ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली असून चंदनाची मौल्यवान अशी अनेक झाडे  अज्ञात चोरट्यांनी कापून नेली आहेत, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
           दहिवड परीसरात यापूर्वी ही अनेक चंदनाच्या झाडांची चोरीच्या घटना घडलेल्या आहेत.याबाबत वनविभागाने व प्रशासनाने दखल घेऊन चंदन चोरांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे नाही तर हे चोर शेतकऱ्यांच्या घरांवर सुध्दा दरोडा टाकू शकतात, अशी भिती परिसरातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या चोरांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी देवळा तालुका प्रहार अध्यक्ष श्री.संजय दहिवडकर यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने