नामपूर (दिनेश सोमवंशी) गेल्या दोन वर्षात कोरोनाने सामान्य माणसाचे जनजीवन विस्कळीत केले, अनेकांचे नातेवाईक हिरावून नेले,अनेकांचा रोजगार गेला, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, परंतु एवढ्या मोठ्या संकटात सुद्धा एक व्यक्ती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता परोपकारासाठी अहोरात्र झटत होती आणि ती म्हणजे कोरोना योद्धा... डॉक्टर्स , इतर वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, पत्रकार, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, आशा सेविका, स्वच्छता कर्मचारी आदी प्रामाणिकपणे आपले काम करीत होते, त्यामुळे अशा महानुभावांचा सत्कार होणे अपेक्षित आहे अशी मनस्वी इच्छा पुरस्कारांची आयोजक दिनेश पगारे व सचिन पगारे यांनी आपल्या सहकाऱ्यांजवळ व्यक्त केली, त्यानुसार कार्यक्रमांचे नियोजन करत पुरस्कार वितरण समितीने आराई गावातील शिवतीर्थ जवळ ग्रामपंचायत सभागृहामध्ये पुरस्कार वितरण तसेच सन्मान सोहळा आयोजित केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की नियोजित मालेगाव जिल्ह्यातील नावाजलेली सामाजिक संस्था सत्यदर्शी सोशल फाउंडेशन व शिवशंभु संघटना महाराष्ट्र राज्य बागलाण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आराई येथे कोरोना योद्धा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक कोरोना योद्ध्यांचा त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला
याप्रसंगी प्रमुख मान्यवर जलदूत तथा सैनिक मित्र मविप्रचे अध्यक्ष डॉ.तुषार (दादा) शेवाळे,सौ.ज्योतीताई आहिरे उपसभापती पं. स. सटाणा, सौ मनीषाताई आहिरे लोकनियुक्त सरपंच आराई, पोपटराव बच्छाव सामाजिक कार्यकर्ते सटाणा, डॉ.गोकुळ आहिरे, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते
सत्यदर्शी फाऊंडेशन व शिवशंभु संघटनेच्या वतीने तालुक्यातील कोरोना योद्धा यांना अठरा पुरस्कार व प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले, तसेच अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
पुरस्कारार्थीची नावे:
१)मनोहर शेवाळे, पत्रकार जय महाराष्ट्र न्यूज, तथा संपादक वृत्तवेध,
२)जय योगेशपगारे : संपादक मालेगाव लाईव्ह,
३)संतोष जाधव : पत्रकार -दैनिक लोक राजकारण , ४)हिरालाल बाविस्कर: पत्रकार -दैनिक लोकनामा,
५) प्रशांत कोठावदे: दैनिक द नाशिक हेरॉल्ड,
६)रोशन खैरनार : पत्रकार दैनिक सकाळ ,
७)स्वप्नील अहिरे: पत्रकार दैनिक सकाळ
८)गणेश सोनवणे: पत्रकार - दैनिक गावकरी.
९)सरपंच,उपसरपंच,सदस्य व सर्व कर्मचारी वृंद. ग्रा. प आराई
१०) सरला सतीश अहिरे - बचत गट
११) डॉ गोकुळ दशरथ अहिरे
१२)गणेश श्रावण पाटिल
१३)सुरेश केदा अहिरे
१४)सचिन दगडू भदाणे - आरोग्य सेवक .
१५)दिनेश नारायण गायकवाड- आरोग्य सेवक
१६) कारभारी नानाजी भदाणे पोलीस पाटिल - सामाजिक कार्यकर्ते
१७) जितेंद्र (बापू ) सूर्यवंशी - सामाजिक कार्यकर्ते
१८) रविराज बच्छाव - पोलीस कॉस्टेबल
याप्रसंगी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रम ऊत्साहात पार पाडला, संघटनेचे जिल्हा श्री जोशी कार्यक्रमाला उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सत्यदर्शी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा शिवशंभु संघटनेचे तालुका अध्यक्ष दिनेश पगार, सचिन पगारे यांनी मेहनत घेतली तसेच श्री रविराज बच्छाव साहेब यांनी घेतलेले परिश्रम अनमोल आहेत.
जिल्हा तसेच तालुका कार्याध्यक्ष कैलास पवार आणि तालुकाध्यक्ष आनंद दाणी, शहराध्यक्ष रोहित आहिरे, जेष्ठ पत्रकार श्री संतोष जाधव व इतर सर्व पत्रकार हजर होते, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत आराई चे सरपंच, सदस्य व सर्व पदाधिकारी यांनी विशेष सहकार्य केले
कोरोना योद्ध्यांचा अशा प्रकारे केला गेलेला सन्मान समाजात एक आदर्श निर्माण करून ठेवेल, पुरस्कारामुळे कार्य करणाऱ्याच्या मनात मोठी ऊर्जा निर्माण होते त्यामुळे समाजाला अधिकाअधिक योगदान मिळवून समाजाची प्रगती होते हे निश्चित आहे त्यामुळे मी आयोजकांचे आभार मानतो, तसेच सर्व पुरस्कारार्थी यांचे अभिनंदनही करतो
- जलदुत तथा सैनिक मित्र डॉ. तुषार दादा शेवाळे
समाजात चांगले काम करणाऱ्यांची दखल समाज घेत असतो. वेगवेगळे पुरस्कार देऊन त्यांचा गौरवही केला जात असतो, या पुरस्कारामुळे पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीचा गौरव होतो, तर इतरांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत राहील
- दिनेश पगारे, संस्थापक अध्यक्ष सत्यदर्शी सोशल फाउंडेशन
पुरस्कार प्रेरणा देतात ,प्रेरणेने राष्ट्र मोठे होते. अर्थातच उत्तम कार्य करणाऱ्यांचे कौतुक केले गेले पाहिजे, अशाने समाजात एक आदर्श निर्माण होऊ सत्कार्य करणाऱ्यांची मोठी फळी निर्माण होऊ शकते
- सचिन पगारे - अध्यक्ष: पुरस्कार वितरण समिती.