मालेगाव लाईव्ह न्युज नेटवर्क :- राकेश आहेर | चांदवड देवळा
रामेश्वर येथिल हिरे कुटुंबावर काळाचा घाला.
अपघातात एकाच कुटुंबातील चौघे ठार.
देवळा तालुक्यातील रामेश्वर येथिल रहिवाशी असलेले गोपीनाथ साळूबा हिरे यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला असून एकाच कुटुंबातील चौघांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी दि.१९ सायंकाळच्या ६.३० वाजेच्या देवळा येथे नाशिक रस्त्यावर रामेश्वर फाट्याजवळील हॉटेल दुर्गा जवळ नाशिककडून देवळ्याच्या दिशेने येत असलेल्या ईर्टीगा (क्रमांक एम. एच. ४३- ए. एल -३००९ ) व दुचाकी प्लेंडर ( क्रमांक एम. एच , ४१ - के ५६६१ ) या दुचाकीवरून गोपीनाथ साळूबा हिरे (वय ४२) हे आपल्या कुटुंबासह पिंपळगाव ( वा ) येथून शेतीचे काम आटोपून रामेश्वर येथे जात असताना हा भिषण अपघात झाला आहे. या झालेल्या भिषण अपघातात गोपीनाथ साळूबा हिरे ( वय ४२ ), यांच्यासह पत्नी मंगलाबाई गोपिनाथ हिरे ( ३५ ), मुलगा गोरख गोपीनाथ हिरे ( १६ ) हे जागीच ठार झाले. तर मुलगी जागृती गोपिनाथ हिरे ( १८ ) ही गंभीर जखमी झाली होती, प्रथम उपचारासाठी देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथुन जागृतीला अधिक उपचारासाठी मालेगाव येथे नेत असतांनाच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात इतका भयानक होता की यात दोघंही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने हिरे कुटुंबासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
