मालेगाव :- औषध निर्मात्या कंपन्यांमध्ये देशात प्रख्यात असलेल्या मुंबई येथील इपिसोर्स प्रा. ली. या औषध निर्माण कंपनीत मालेगाव येथील समाजश्री डॉ. प्रशांत दादा हिरे औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय (बी. फार्मसी ) येथील पदवी प्राप्त विद्यार्थिनींची मेडिकल कोडर म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे .
या कंपनीकडून मेडिकल कोडर पद भरतीसाठी तीन टप्प्यात ऑनलाईन परीक्षा, मुलाखत घेण्यात आली, या सर्व प्रक्रियेत गौरी सतीश महाजन, अंकिता अमृतकर, जान्हवी क्षीरसागर व अर्चना सूर्यवंशी या विद्यार्थिनींनी गुणवत्तेनुसार बाजी मारली आहे, प्रस्तुत कंपनीमार्फत त्यांना लॅपटॉप व वाय -फाय सुविधाही पुरविण्यात येणार आहे तसेच त्यांना भरभक्कम पॅकेज ही देण्यात येणार आहे.
पहिल्याच मुलाखतीत यशाला गवसणी घालणाऱ्या या युवतींच महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी तथा राज्याचे माजी मंत्री मा. डॉ. प्रशांत दादा हिरे, मा. शिक्षक आमदार मा. डॉ. अपूर्वभाऊ हिरे, विश्वस्त मा. डॉ. अद्वय (आबा) हिरे-पाटील, सीडीसी चेअरमन प्रतीक काळे , फार्मसी कॉलेज प्राचार्य डॉ. एस. आर. तांबे आणि समाजश्री डॉ. प्रशांत दादा हिरे औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापक, सर्व शिक्षकेतर वृंद यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags
malegaon pharmacy