📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगाव येथील भारतीय जनता पार्टी जिल्हा व शहराच्या वतीने एस टी महामंडळ कर्मचारी आंदोलनाला पाठिंबा

मालेगाव (जय योगेश पगारे ) राज्यभर चालू असलेल्या आंदोलनात भारतीय जनता पार्टीने उडी घेतली असून त्याच अनुषंगाने आज मालेगाव येथील आगारात बसलेल्या कर्मचारींना पाठिंबा देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते मा. डॉ.अद्वयआबा हिरे - पाटील  यांच्या सह भारतीय जनता पार्टी मालेगाव जिल्हा व शहर सहभागी झाले.  त्यामुळे येथील आंदोलनाला धार आली असता यावेळी डॉ.अद्वयआबा हिरे-पाटील म्हणाले की राज्य सरकारने एस टी कर्मचारीवर करत असलेला अन्याय त्वरित थांबवावा. संकट काळी महाराष्ट्राला वेळोवेळो आपले कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचारी वर्गाला वेठीस धरले जाते. कोरोना काळात नागरिकांना सोडविण्याचे काम असेल मुंबईत जाऊन सेवा देणे असेल, आणि ते देखील तुटपुंज्या मानधनात केले. तरी देखील सरकारला कर्मचाऱ्यांची दया येत नसेल तर भारतीय जनता पार्टी नेहमीच अन्यायाच्या विरोधात चाललेल्या लढ्यात आपल्या पाठीशी असल्याचे आश्वासन डॉ.हिरे-पाटील यांनी दिले.
तसेच जिल्हाउपाध्यक्ष हरिप्रसाद गुप्ता, जिल्हा संघटन सरचिटणीस देवा पाटील यांची भाषणे झाले. 
तसेच पाठिंब्याचे पत्र देखील भाजपा तर्फे आंदोलकांना देण्यात आले.
राज्यभर  ३५ कर्मचारींनी आत्महत्या केली त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी व राज्य सरकारच्या निषेधार्थ मुंडन याठिकाणी कर्मचारींनी केले. यावेळी शहराध्यक्ष मदन बापू गायकवाड, शहर संघटन सरचिटणीस जयप्रकाश पठाडे,
राजेंद्र शेलार, जयसिंग परदेशी, एस.सी. आघाडी जिल्हाध्यक्ष योगेश पाथरे, विजय एथाल,  सांस्कृतिक आघाडी जिल्हाध्यक्ष सतीश उपाध्ये, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कुणाल सूर्यवंशी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कमलेश सोनवणे, श्याम गांगुर्डे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष स्वप्नील भदाणे, कमलेश अहिरे,  दर्शन पवार व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तसेच कर्मचारी उपस्थित होते






टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने