📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

व्यापारी व त्याच्या साथीदारांकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण; कृउबास मालेगावातील धक्कादायक प्रकार

🛑माझ्याकडे माल का लावला नाही या कारणावरून व्यापारी व त्याच्या साथीदारांकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण!
🛑रात्रीच शहर सोडण्यासाठी दिला दम!
🛑एवढा माज येतो कुठून?
🛑 घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

मालेगाव (मनोहर शेवाळे) आधीच अस्मानी सुलतानी संकटाने जेरीस आलेल्या शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आलेली असताना दस्तुरखुद्द कृषिमंत्र्यांच्या गावातील बाजार समिती मधील व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे
(trader with accomplice brutally thrashed farmers in apmc malegaon)

याबाबत सविस्तर वृत्त असे की मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पाचोरा येथून दिलीप पवार व ताजमल पवार हे दोघे शेतकरी आपला मालक विक्रीसाठी मालेगाव बाजार समितीच्या आवारात घेऊन आले होते, त्यांनी एका व्यापाऱ्याकडे त्यांचे वाहन लावल्याने संतापलेल्या दुसऱ्या व्यापाऱ्याने त्यांना याबाबत विचारणा करून माल माझ्याकडे का लावला नाही? मी पण चांगला भाव देतो, दुसरीकडे कसा माल विकतो ते मी बघतो अशाप्रकारे दमदाटी करून बाचाबाचीचे रूपांतर मारहाणीत झाले,

 व्यापाऱ्याच्या दोन साथीदारांनी शेतकऱ्यावर हल्ला चढविला, दोघांनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करीत शेतकऱ्याला गंभीर दुखापत केली, याशिवाय आत्ताच्या आत्ता मार्केट समिती व मालेगाव शहर सोडा असा दम देऊन शेतकऱ्याला हुसकावून लावले.

या अतिशय गंभीर प्रकरणावर बाजार समिती काय कारवाई करते यावर सर्वांचे लक्ष लागून आहे, मालेगाव शहरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहेत, अशा लोकांना एवढा माज येतो कुठून हा मुख्य प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला आहे, बऱ्याच गोष्टींमध्ये दादागिरी करणे हे आता नित्याचे झाले असून खुद्द कृषिमंत्र्यांच्या गावातील बाजार समितीत हा प्रकार घडणे अतिशय निंदनीय व गंभीर आहे.

या प्रकरणावर संबंधितांवर कठोर कारवाई करून त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातर्फे केली जात आहे, याआधीही बाजार समितीत अशा अनेक घटना घडल्या ची माहिती समोर येत आहे. शेतकऱ्यांना चहुबाजूने अशाच प्रकारची अवहेलना होत असल्यास आम्ही जीव द्यायचा का असा सवाल संतप्त शेतकऱ्याने विचारला असून याबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
____________________________________

मार्केट यार्डात आलेल्या शेतकऱ्याला मारहाण करण्याचा प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला. यार्डात रात्रीची गस्त घातली जात असून, तीच पुढेही कायम सुरू ठेवण्यात येणार असून, संबंधित व्यापाऱ्यास या बाबदतचा खुलासा करावा अथवा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल असे लेखी पत्र बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

देसले, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती,मालेगाव
सदर घटना सीसीटीवी मध्ये कैद झाली असून व्हिडिओ बघा: 



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने