प्रशांत गिरासे | देवळा
सावकी
🔴वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा
🔴शेतीपिकांचे नुकसान
🔴अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली
🔴विद्युत खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडीत
🔴एक जण जखमी
देवळा तालुक्यातील सावकी गावाला तसेच आसपासच्या परिसराला सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊसाने झोडपले यामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले असून वादळामुळे अनेक ठिकाणी घराचे पत्रे उडाले असून काही ठिकाणी मोठं-मोठे झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत यामूळे एकाला दुखापत झाली असून अनेक ठिकाणी विद्युत खांबही कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.
वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठं-मोठे झाडे उन्मळून पडली होती यामुळे वाहतूकीस रस्ता बंद झाल्याने वाहतूक खोळंबली होती स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करत वाहतूक सुरू केली आहे तसेच अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.