📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सोहम योगा अकॅडमीच्या स्पर्धकांची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत चमकदार कामगिरी; पार्थ सचिन शिंदे राज्यात प्रथम

मालेगाव (जय योगेश पगारे) महाराष्ट्र योग असोसिएशन च्या वतीने कोरोना ची परिस्थिती लक्षात घेत. दि. २२ - २३ सप्टेंबर व  २ - ३ ऑक्टोंबर ह्या रोजी ऑनलाईन माध्यमातून  राज्यस्तरीय योगासन स्पर्धा घेण्यात आल्या.
सदर स्पर्धेत मालेगाव येथील सोहम योगा अकॅडमी च्या अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला व चमकदार कामगिरि करत तब्बल नऊ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेत निवड करण्यात आली. त्यामध्ये 

वयोगट १० ते १२ मध्ये, 
पार्थ सचिन शिंदे (प्रथम)
प्रेम प्रमोद शेलर (तृतीय)
वयोगट १२-१४ मध्ये, 
पवन शरद आहिरे ( प्रथम )
वयोगट १४-१६ मध्ये, 
हर्षदा दिनेश जाधव (राखीव)
रोहित प्रमोद कदम (राखीव)
वयोगट १६-१८ मध्ये,
कीर्ती राजेंद्र बोरसे ( प्रथम )
निकिता रविंद्र आहिरे( तृतीय )
व तसेच सोहम योगा अकॅडमी चे संचालक , योग प्रशिक्षक - श्री. चेतन वाघ यांनी देखिल वायोगट २१ ते ३० या  मध्ये ( द्वितीय क्रमांक ) पटकाविला .
 गुरु व शिष्य हे सर्व विजयी  झालेले खेळाडू योगा फेडरेशन ऑफ इंडिया च्यावतीने नोव्हेंबर महिन्यात आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होतील.
सर्व विजयी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पंच- अनिता पाटील व राष्ट्रीय पंच- चेतन वाघ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. विजयी स्पर्धकांनी नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत मालेगांव व नाशिक जिल्ह्याचा लौकिक वाढविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने