रायगड (जय योगेश पगारे) कांद्याच्या दाेन गाेणी खरेदी करुन त्या बदल्यात विक्रेत्याला बनावट नाेटा देणाऱ्या तिघांना पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत. ४९ हजार ९०० रुपयांच्या बनावट नाेटा, प्रिंटर, लॅपटाॅपसह अन्य साहित्य पाेलिसांनी जप्त केले आहे. सदरची घटना २९ सप्टेंबर राेजी घडली आहे. तिन्ही आराेपीना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मंगळवारपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख दयानंद गावडे यांनी दिली. जयदीप अजीत घासे (२६) सुमित सुनिल बागकर (२६) काैस्तुभ चंद्रकांत गिजम (२४) सर्व राहणार अलिबाग अशी आराेपींची नावे आहे .
अन्य एका आराेपीचा पाेलिस शाेध घेत आहेत. २९ सप्टेंबर राेजी अलिबाग बायपास राेड येथे अशाेक पाेकळे यांच्याकडू जयदीप आणि सुमित यांनी दाेन कांद्याच्या गाेणी खरेदी केल्या. त्यानंतर शंभर रुपयांच्या २२ नाेटा असे दाेन हजार दाेनशे रुपये पाेकळे यांना दिले. त्यानतंर सदरच्या नाेटा बनावट असल्याचे लक्षात आले. रितसर तक्रार केल्यानंतर पाेलिसांनी तिन्ही आराेपींना अलिबाग येथूनच अटक केली.
पाेलिसांना या गुन्ह्यात वापरलेले लॅपटाॅप, प्रिंटर, शाई, काेरे कागद ताब्यात घेतले आहे, तसेच ५०० रुपयांच्या ६३ नाेटा, २०० रुपयांच्या ८२ नाेटा आणि शंभर रुपयांच्या २२ बनावट नाेटा हस्तगत केल्या आहेत. ज्याची चलनातील किंमत ही ४९ हजार ९०० रुपये हाेते.दरम्यान, आधीही या त्रिकुटाने मच्छिविक्रेत, काही दुकाने अशा विविध ठिकाणी बनवाट नाेटा वटवल्या असल्याचेही गावडे यांनी स्पष्ट केले.
