📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

धक्कादायक : अंगावर गुलाल, हळदी-कुंकू टाकलेला बालकाचा मृतदेह आढळला, नरबळीचा प्रकार?

पुणे (कल्पेश सोनार ) पुरोगामी महाराष्ट्र राज्याच्या नावाला काळीमा फासण्याचा एक धक्कादायक प्रकार घडल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.

 कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कापशी  येथील आरव या सात वर्षीय बालकाचा मृतदेह आढळून आला आहे. हा नरबळीचा प्रकार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 दोन दिवसांपासून आरव घरातून बेपत्ता झाला होता त्यामुळे पालकांनी त्याच्या अपहरणाची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. ग्रामस्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी आरवची शोधाशोध सुरू होती. त्याचबरोबर शाहूवाडी पोलिसांनी या शोधासाठी पथके पाठवली होती. मात्र आज सकाळी सहा वाजता आरवचा मृतदेह त्याच्या घराच्या पाठीमागे सापडला.

आरवच्या अंगावर गुलाल, हळदी-कुंकू टाकण्यात आलं होतं. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी अधिक तपास शाहूवाडी पोलीस करत आहेत या चिमुकल्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Photo courtesy: Lokmat 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने