📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

आज दुपारनंतर धोधो, पाऊस नाशिक जिल्ह्याला झोडपणार?

मुंबई (कल्पेश सोनार) राज्यातील अनेक भागात काल सायंकाळ नंतर पुणे ,सातारा , सांगली, कोल्हापूर भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.. दरम्यान पुढच्या ३-४ दिवस देखील असाच पाऊस राज्यातल्या काही भागात कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 
 5 ऑक्टोबर
कोकण विभागात काही ठिकाणी, दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. आज जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अहमदनगर, रत्नागिरी या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

6 ऑक्टोबर
कोकण विभागात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

7 ऑक्टोबर
कोकण विभागात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस  तसेच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मराठवाडा विभागात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने