📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

प्रदीर्घ देशसेवा करून निवृत्त झालेल्या मेजर बोरसे यांचे देवळ्यात जंगी स्वागत!

राकेश आहेर | चांदवड देवळा
     देवळा तालुक्यातील मेशी येथील भूमिपुत्र प्रविण बोरसे २० वर्षांच्या देशसेवेनंतर बटालियन हवालदार मेजर पदावरून सेवानिवृत्त झाले. जन्मगावी येताच त्यांचे मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. यानंतर देवळा शहरात जंगी मिरवणूक काढत त्यांचे स्वागत केले.
     प्रविण हे २००१ नाशिक येथे पॅराशुट रेजिमेंटमध्ये भरती झाले. पहिली पोस्टिंग त्यांना श्रीनगर येथे मिळाली. ११ सप्टें २०१६ रोजी सुरंगकोट जम्मू-काश्मीर येथे रोड ओपनिंग पार्टी संपल्यानंतर गाडीने युनिटमध्ये परत येत असताना मेजर प्रविण आणि त्यांची संपूर्ण टीम ज्या ठिकाणाहून गाडीत बसणार होती त्या ठिकाणच्या आधी पाचशे मीटर अंतरावर असणारे गाडी वर आतंकवादी हल्ला झाला होता. मेजर प्रवीण यांच्याकडे लाईट गन मशीन असल्यामुळे त्यांनी लगातार ब्रास्ट केला, आतंकवाद्यांना चोख प्रत्युत्तर देऊन संपूर्ण टीम सुखरुप वाचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ३५ जवानांचे प्राण वाचवण्यात यशस्वी झाले. या कामगिरीमुळे त्यांना उत्तम लीडरशिप मानपत्र मिळाले. बटालियन मेजर हवालदार या पदावर नियुक्ती झाली. मेजर प्रवीण म्हणतात की हा गौरव माझा नसून माझ्या संपूर्ण टीमच होता आणि आहे. त्यांनी श्रीनगर, सुरांगकोट, नाशिक, मेरत अश्या ठिकाणी राहून देशाची सेवा केली त्यांच्या कार्यकाळात त्यांनी एकूण ४५ प्यारा जम्प पूर्ण केले.
        मेशी ता. देवळा येथे सकाळी परतल्यानंतर गावातून त्यांची बँड च्या तालासुरात मिरवणूक झाली. यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते. देवळा शहरात आल्यानंतर सैन्य दलातील इतर जवान, नातलग यांनी त्यांचे पुष्पहार शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. गुंजाळवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पुष्पहार अर्पण करत या मिरवणुकीची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने