मालेगाव | सचिन पगारे
सबंध भारतात गेल्या दीड तासापासून फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम वापरण्यात अडथळे येत आहेत, तज्ज्ञांच्या मते हा सर्वर मधील बिघाडाचा दोष असल्यामुळे ही अडचण येत असेल.
व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि फेसबुक मेसेंजरमध्ये तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि फेसबुक मेसेंजरची सेवा खंडित झाली आहे. अँड्रॉईड, आयओएससोबतच डेस्कस्टॉपवरही समस्या उद्भवत असल्यानं वापरकर्ते त्रासले आहेत.
याशिवाय काही फोन मध्ये इंटरनेट चालत नसून कस्टमर केअर शी संपर्क होत नाहीये त्यामुळे वापरकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.
बर्याचदा अशा प्रकारच्या अडचणी अनुभवायास मिळाल्या परंतु यावेळी जरा जास्तच वेळ सोशल मीडिया बंद असल्यामुळे वापरकर्त्यां मधली बेचैनी वाढल्याची चित्र आहे.
सदर सर्वर लवकरात लवकर दुरूस्त होवो, अशी प्रार्थना प्रत्येक जण करत असेल, यातच काही विनोद बुद्धीच्या लोकांनी सरळ देवाला नवसच करून टाकला आहे!
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक जगभरातील अनेक ठिकाणी ठप्प झालं आहे. यामुळे वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत व्हॉट्सअॅप, फेसबुकने आपल्या वेबसाईटवर मॅसेज लिहीत दिलगिरी व्यक्त केली आहे. “माफ करा, काहीतरी चुकीचं झालं आहे. आम्ही गुंता सोडवण्याचं काम करत आहोत. लवकरच सर्व काही सुरळीत होईल”, असं फेसबुकनं आपल्या मॅसेजमध्ये लिहीलं आहे