📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

पुष्पक एक्सप्रेस मध्ये दरोडा टाकून वीस वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार

प्रशांत गिरासे | नाशिक प्रतिनिधी

लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस मध्ये दरोडा टाकून  महिलेवर सामुहिक बलात्कार  केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर अन्य  जणांचा शोध घेतला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की धावत्या रेल्वेत आठ नराधमांनी रेल्वेतील 15 ते 20 प्रवाशांना लुटल्यानंतर त्यांनी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या 20  वर्षीय तरुणीवर पतीसमोरच बलात्कार केल्याची माहिती आहे.

आणखी किती निर्भया? पतीच्या समोरच अत्याचार..
पीडित महिलेच्या नवऱ्याला लोखंडी राँडने मारहाण करून पतीच्या समोरच पत्नीला चाकूचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार करण्यात आले. हे सर्व आरोपी नाशिकचे असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी चौघांना रेल्वे पोलिसानी अटक केली आहे. पुष्पक एक्सप्रेसच्या डी ०२ बोगीमध्ये ही घटना घडली आहे. आरोपींनी तब्बल ९६ हजारांची लूट केली आहे

माणुसकीला काळीमा फासणारी घटना लखनौहून मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये इगतपुरी रेल्वे स्थानका दरम्यान ही घटना घडली आहे. आधी रेल्वेत लूट केली. त्यानंतर पतीसोबत प्रवास करणाऱ्या महिलेला धमकावून तिच्यावर अत्याचार केले.

आळा बसणे ही काळाची गरज
आपण पाहिले तर अशा घटना कुठे ना कुठे आपल्या वाचनात येतात व एका बाजूने हजारो वर्षापासून सुसंस्कृतपणाची आपल्या देशाची परंपरा सांगणार्‍या देशात आता स्त्रियांवरील अत्याचारांची परंपरा जणू जन्माला घातली जात आहे. एकीकडे आपण महासत्ता होण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करीत आहोत, तर दुसर्‍या बाजूने स्त्रियांवर अत्याचारांचे आक्रमण होत आहे. देशाची शान, देशाची मान राखण्यासाठी अशा अपमानकारक व लज्जास्पद घटनांना आळा बसणे ही काळाची गरज आहे. त्यासंबंधी संबंधितांनी गंभीरपणे विचार करणे आणि मुख्य म्हणजे कृती करणे गरजेचे आहे.

प्राथामिक माहितीनुसार शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून ट्रेन मुंबईच्या दिशेने येत असताना इगतपुरी स्थानक सोडल्यानंतर ट्रेन बोगद्याजवळ पोचली. त्यावेळी ट्रेन स्लो असल्याने सात ते आठ जण ट्रेनमध्ये चढले. त्यांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच ज्या प्रवाशांनी त्यांना प्रतिकार करणाऱ्या करण्याचा प्रयत्न केला त्यांना या दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली.

 दरम्यान काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन कल्याण स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले. दोन दरोडेखोर कल्याण पोलीसांनी ताब्यात असल्याची प्राथमिक माहिती आहे उर्वरित आरोपींच्या पोलीस शोध घेत आहेत. कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने