📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवळा तालुक्यात कवच कुंडल मोहिमेला सुरुवात

 देवळा | ज्ञानेश्वर आढाव
      
     आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कवच कुंडल मोहिमेला आज देवळा तालुक्यात सुरूवात करण्यात आली, देवळा तालुका आरोग्य अधिकारी मा.डाॅ.सुधीर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कवच कुंडल मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
             देवळा तालुक्यातील वासोळ येथील आदिवासी वस्ती इंदिरा नगर येथे लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले.या लसीकरण सत्रात 200पेक्षा अधिक आदिवासी बांधवांनी यांचा लाभ घेतला.
     आदिवासी बांधवांमध्ये लसीकरणाबददल आदल्या दिवशी जनजागृती करण्यात आली. आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांनी जनजागृती केली.
         लसीकरण मोहिम यशस्वी होण्यासाठी मा.वैदयकीय अधिकारी मेशी येथील डाॅ. मोरे मॅडम, डॉ.सरभी मॅडम तसेच आरोग्य सहाय्यक ठोके,गरुड नाना, सोनवणे नाना, आरोग्य सेवक महेश सुर्यवंशी, आरोग्य सेविका वंदना बच्छाव, आशाताई व वासोळ येथील ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने