📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

प्रतिबंधित असताना विक्रीसाठी अवैधरीत्या वाहतूक करण्यात येत असलेला लाखोंचा गुटखा पकडण्यात पोलिसांना यश

जायखेडा (मनोहर शेवाळे) आज सकाळी 6 वा. सुमारास ताहराबाद ते नामपुर जाणारे रोडवर महाराष्ट्र शासनाने विक्रीस प्रतिबंध केलेला पानमसाला (गुटखा) व सुगंधीत तंबाखु अवैधरित्या विक्री करण्याचे उद्देशाने जायखेडा गावच्या बसथांब्याजवळ आयशर कंपनीची चारचाकी मालवाहू वाहन क्रं. MH 41 AU 1715 वाहतूक करताना पकडण्यात आला, 
 वाहनचालकाचे नाव किशोर वसंत ठाकरे, वय २५. रा. बिजोरसे, इजमाने रोड,असे असून  त्याचे ताब्यात असलेले वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये खालील वर्णनाचा व किंमतीचा महाराष्ट्र शासनाने विक्रीस प्रतिबंध केलेला पानमसाला (गुटखा) व सुगंधीत तंबाखु अवैधरित्या विक्री करण्याचे उद्येशाने वरील वर्णनाचे वाहनासह ताब्यात बाळगुन वाहतुक करित असतांना मिळुन आला, त्यास त्याचे ताब्यातील सदर सुगंधीत पानमसाला व सुगंधीत तंबाखु याबाबत विचारपुस करता त्याने कोणत्याही खरेदी विक्रीच्या पावत्या अगर वाहतुक परवाना सादर केला नाही. तसेच सदर प्रतिबंधीत गुटखा व सुगंधीत तंबाखुचे मुळ मालकाबाबत विचारपुस करता त्याचे सांगणे की, सदरचा प्रतिबंधीत गुटखा व सुगंधीत तंबाखु ही नामपुर येथील इसम नामे महेंद्र वसत अहिरे (पांडकर), रा. बाजारपेठ, नामपुर याचे मालकिचा असुन त्याचे सांगणेवरुन मी सदरचा माल हा गुजरात राज्यातुन नामपुर गावामध्ये विक्री करण्याचे उद्येशाने घेवून जात आहे. ताब्यात असलेल्या इसमाचे ताब्यात मिळुन आलेल्या मुद्येमालाचे बाजारमूल्य 2798800 इतके आहे, त्यानुसार पोलिसांनी सदर मुद्देमाल ताब्यात घेतला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने