📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

स्कूल चले हम! उद्यापासून सुरू होणार शाळा!! विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण...

मुंबई (जय योगेश पगारे) अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार उद्या म्हणजेच 4 ऑक्टोबर पासून राज्यातील शाळा सुरू होणार आहे,

शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे शाळा सुरु करण्यास परवानगी मागितली होती. अनेक दिवसांपासून पालक आणि विद्यार्थ्यांकडून शाळा सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर ही मागणी पूर्ण करण्यात झाली असून उद्यापासून राज्यात शाळेची घंटा वाजणार आहे.

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत याआधी शिक्षण विभागाकडून तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता त्यासोबत तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता अनेक मोठ्या शहरात शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. आता मात्र शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकराने नेमलेले तज्ज्ञ डॉक्टरांच्या चाइल्ड टास्क फोर्स सकारात्मक असून कोरोना स्थिती नियंत्रणमध्ये राहिल्यास दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यास त्यांनी हिरवा कंदील दाखवला होता.

गणेशोत्सवात कोरोनाचे आकडे फारसे वाढलेले दिसत नाहीये. शिवाय आणखी गणेशोत्सवनंतरचे 10 ते 12 दिवस कोरोना स्थितीचा आढावा घेऊन सोबतच दिवाळी सारख्या मोठ्या सणाच्या दरम्यान कोरोना परिस्थिती पाहून दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यास हरकत नसल्याचे चाइल्ड टास्क फोर्स सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले होते. त्यानंतर आता 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्यास खुद्द मुख्यमंत्र्यांनीच परवानगी दिली आहे.

शाळा सुरू होणार यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून आनंदाचे वातावरण आहे, ऑफलाइन शाळेची मजा काही औरच आहे असे अनेक विद्यार्थ्यांनी मालेगाव लाईव्ह शी बोलताना सांगितले, जरी ऑनलाइन शाळा सुरु होत्या पण वर्गात बसण्याची जी मजा असते ती नाही, शिवाय अभ्यासातही मन रमत नव्हते, वर्ग मित्र-मैत्रिणी सोबत नसल्याने अभ्यासा करायला ही मरगळ आल्यासारखे वाटत होते असे दुसऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले.

या सोबतच अनेक उपक्रमशील शिक्षकांना ही शाळा कधी सुरू होतील याबाबत चिंता लागून होती, परंतु आता शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देता येईल व एकंदरीत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांच्या भविष्याचा उज्वल प्रवास सुरू होईल अशी भावना अनेक शिक्षकांनी व्यक्त केली

फोटो सौजन्य: tribune,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने